अंगणवाडी होणार आता स्मार्ट | Anganwadi | Smart | kolhapur | Children | Sakal Media<br />कौलारू छत असलेली छोटीशी खोली, एखादा टेबल आणि भिंतीवर टांगलेला फळा असे काहीसे चित्र अंगणवाडीचे असायचे. छोटी छोटी मुले आणि त्यांना उपलब्ध असणाऱ्या तोडक्या मोडक्या शैक्षणिक साहित्याचा आधार घेऊन प्राथमिक शिक्षण देणाऱ्या अंगणवाडी सेविका असे अंगणवाडीचे स्वरूप गावागावात पहायला मिळायचे. बालवयात शिक्षणाची गोडी लावून, बालमनाला आकार देणाऱ्या अशा अंगणवाड्यांचे रूपडे सध्या पालटत आहे. सध्या काळानुरूप शैक्षणिक पद्धतीत बदल करत अंगणवाड्या ‘स्मार्ट’ होऊ लागल्या आहेत. ही स्मार्ट अंगणवाडी नेमकी कशी आहे ?, ती पहा या व्हिडीओतून <br />(रिपोर्टर - नंदिनी नरेवाडी ) (व्हिडीओ - बी. डी. चेचर)<br />#Kolhapur #Anganwadi #SmartAnganwadi #Education #Children